जून १९८९ पासूनचा शैक्षणिक प्रवास पूर्ण; ग्रेडेड मुख्याध्यापक मीराबाई सांळुखे सेवानिवृत्त
तीन दशकांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात योगदान; परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव
भडगाव | प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात तब्बल तीन दशकांहून अधिक काळ सेवा बजावल्यानंतर ग्रेडेड मुख्याध्यापक मीराबाई सांळुखे या सेवानिवृत्त झाल्या आहेत. जून १९८९ पासून सुरू झालेला त्यांचा शैक्षणिक प्रवास ३० एप्रिल २०२६ रोजी पूर्ण झाला असून, त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे शिक्षण क्षेत्रातील एका समर्पित आणि कर्तव्यदक्ष प्रवासाचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मीराबाई सांळुखे या भडगाव तालुक्यातील टोणगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत ग्रेडेड मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होत्या. आपल्या सेवाकाळात त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, शिस्तबद्ध शिक्षण व्यवस्थेसाठी आणि गुणवत्तापूर्ण अध्यापनासाठी सातत्याने योगदान दिले.
जून १९८९ पासून सुरू झालेल्या सेवेत त्यांनी विद्यार्थीहित, कर्तव्यनिष्ठा आणि शिक्षणाची गुणवत्ता या मूल्यांना नेहमी प्राधान्य दिले. अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला.
३० एप्रिल २०२६ रोजी त्या अधिकृतपणे सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे परिसरात त्यांच्याबद्दल कृतज्ञता आणि गौरवभावना व्यक्त होत असून, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
वैयक्तिक आयुष्यातही त्यांची सामाजिक ओळख महत्त्वाची आहे. त्या मुद्रांक विक्रेता मधुकर पवार यांच्या पत्नी तसेच ॲड. कल्पेश पवार यांच्या मातोश्री आहेत.
— सूक्ष्मलोक NEWS
सूक्ष्मलोकच्या वृत्ताची दखल; प्रभाग क्र. १० मध्ये लिक्विड फवारणीसाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज भडगाव, प्रतिनिधी…
प्रभाग क्र. १० मध्ये डास प्रतिबंधक फवारणीला आरोग्य विभागाचा हेतुपुरस्सर विलंब? नागरिकांमध्ये संताप भडगाव, प्रतिनिधी…
संकटमोचकांचा आशीर्वाद कुणाला ? उमेदवारीवर राजकीय उत्सुकता जळगाव | विशेष विश्लेषण जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था…
अंजनविहिरे ग्रामपंचायतीकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भडगाव तालुक्यातील अंजनविहिरे येथील ग्रामपंचायत सदस्या ताईसो. रत्नाबाई जयवंत पाटील…
भडगाव तहसीलदार व पुरवठा निरीक्षकांची दस्त बनावट प्रकरणातून निर्दोष मुक्तता १६ वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याचा…