filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0001,0.0000; brp_del_sen:0.1300,0.0000; motionR: 65536; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 34;zeissColor: bright;
भडगाव, प्रतिनिधी : प्रभाग क्र. १० मध्ये वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असताना, साप्ताहिक सूक्ष्मलोकने या समस्येवर प्रकाशित केलेल्या वृत्ताची अखेर नगर परिषद आरोग्य विभागाने दखल घेतली आहे. विभागाकडून संबंधित परिसरात डास प्रतिबंधक लिक्विड फवारणीसाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली असून प्रत्यक्ष फवारणीस सुरुवात करण्यात आली आहे.
काल प्रकाशित झालेल्या वृत्तात प्रभाग क्र. १० मध्ये दीर्घकाळापासून डास प्रतिबंधक फवारणी होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे तसेच डेंग्यू, मलेरिया आदी साथीच्या आजारांचा धोका वाढल्याचे अधोरेखित करण्यात आले होते. या वृत्तानंतर तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या भूमिकेमुळे आरोग्य विभागाने तातडीने हालचाली करत आवश्यक यंत्रणा परिसरात पाठविली.
दरम्यान, प्रभाग क्र. १० च्या नगरसेविका सौ. ज्योती जितेंद्र आचारी व शिवसेना उपशहर प्रमुख जितेंद्र आचारी यांनी संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांविरोधात वरिष्ठ स्तरावर तक्रार करण्याचा इशारा दिला होता. या भूमिकेनंतर आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत फवारणीसाठी कर्मचारी व यंत्रणा कार्यरत केली.
प्रभागातील नागरिकांनी या त्वरित कारवाईबद्दल समाधान व्यक्त करत नगरसेविका सौ. ज्योती आचारी, शिवसेना उपशहर प्रमुख जितेंद्र आचारी तसेच नगर परिषद आरोग्य विभागाचे आभार मानले. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर वेळेत दखल घेतल्यास अशा समस्या टाळता येऊ शकतात, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
प्रभाग क्र. १० मध्ये डास प्रतिबंधक लिक्विड फवारणीसाठी आरोग्य विभागाने तातडीने यंत्रणा पाठविल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नगरसेविका सौ. ज्योती जितेंद्र आचारी व शिवसेना उपशहर प्रमुख जितेंद्र आचारी यांनी प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे विशेष आभार मानले. तसेच साप्ताहिक सूक्ष्मलोकने जनहिताचा प्रश्न प्रभावीपणे मांडून प्रशासनाला जाग आणल्याबद्दलही नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
प्रभाग क्र. १० मध्ये डास प्रतिबंधक फवारणीला आरोग्य विभागाचा हेतुपुरस्सर विलंब? नागरिकांमध्ये संताप भडगाव, प्रतिनिधी…
संकटमोचकांचा आशीर्वाद कुणाला ? उमेदवारीवर राजकीय उत्सुकता जळगाव | विशेष विश्लेषण जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था…
अंजनविहिरे ग्रामपंचायतीकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भडगाव तालुक्यातील अंजनविहिरे येथील ग्रामपंचायत सदस्या ताईसो. रत्नाबाई जयवंत पाटील…
भडगाव तहसीलदार व पुरवठा निरीक्षकांची दस्त बनावट प्रकरणातून निर्दोष मुक्तता १६ वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याचा…
भडगाव तहसील कार्यालयाकडून महत्त्वाचे आवाहन तहसील कार्यालय भडगाव येथील संजय गांधी शाखेमार्फत सर्व केंद्र चालक…