Featured

सूक्ष्मलोकच्या वृत्ताची दखल; प्रभाग क्र. १० मध्ये लिक्विड फवारणीसाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज

सूक्ष्मलोकच्या वृत्ताची दखल; प्रभाग क्र. १० मध्ये लिक्विड फवारणीसाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज

भडगाव, प्रतिनिधी : प्रभाग क्र. १० मध्ये वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असताना, साप्ताहिक सूक्ष्मलोकने या समस्येवर प्रकाशित केलेल्या वृत्ताची अखेर नगर परिषद आरोग्य विभागाने दखल घेतली आहे. विभागाकडून संबंधित परिसरात डास प्रतिबंधक लिक्विड फवारणीसाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली असून प्रत्यक्ष फवारणीस सुरुवात करण्यात आली आहे.

काल प्रकाशित झालेल्या वृत्तात प्रभाग क्र. १० मध्ये दीर्घकाळापासून डास प्रतिबंधक फवारणी होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे तसेच डेंग्यू, मलेरिया आदी साथीच्या आजारांचा धोका वाढल्याचे अधोरेखित करण्यात आले होते. या वृत्तानंतर तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या भूमिकेमुळे आरोग्य विभागाने तातडीने हालचाली करत आवश्यक यंत्रणा परिसरात पाठविली.

दरम्यान, प्रभाग क्र. १० च्या नगरसेविका सौ. ज्योती जितेंद्र आचारीशिवसेना उपशहर प्रमुख जितेंद्र आचारी यांनी संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांविरोधात वरिष्ठ स्तरावर तक्रार करण्याचा इशारा दिला होता. या भूमिकेनंतर आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत फवारणीसाठी कर्मचारी व यंत्रणा कार्यरत केली.

प्रभागातील नागरिकांनी या त्वरित कारवाईबद्दल समाधान व्यक्त करत नगरसेविका सौ. ज्योती आचारी, शिवसेना उपशहर प्रमुख जितेंद्र आचारी तसेच नगर परिषद आरोग्य विभागाचे आभार मानले. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर वेळेत दखल घेतल्यास अशा समस्या टाळता येऊ शकतात, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.


◼ नागरिकांकडून आभार

प्रभाग क्र. १० मध्ये डास प्रतिबंधक लिक्विड फवारणीसाठी आरोग्य विभागाने तातडीने यंत्रणा पाठविल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नगरसेविका सौ. ज्योती जितेंद्र आचारीशिवसेना उपशहर प्रमुख जितेंद्र आचारी यांनी प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे विशेष आभार मानले. तसेच साप्ताहिक सूक्ष्मलोकने जनहिताचा प्रश्न प्रभावीपणे मांडून प्रशासनाला जाग आणल्याबद्दलही नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सूक्ष्मलोक NEWS

sukshmalok.in साकार समाज...राष्ट्राची दक्षता... सूक्ष्मलोक NEWS मालक, प्रकाशक व संपादक : विठ्ठल कौतिक पाटील, ASSK तहसिल कार्यालय भडगाव, ता. भडगाव, जि. जळगाव, महाराष्ट्र – 424105. मोबा. : 9423159516 ई-मेल : sukshmalok@gmail.com “सूक्ष्मलोक” NEWS मध्ये प्रकाशित होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन “सूक्ष्मलोक” NEWS करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम “सूक्ष्मलोक” NEWS द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव “सूक्ष्मलोक” NEWS ’!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *