भडगाव तहसील कार्यालयाकडून महत्त्वाचे आवाहन
तहसील कार्यालय भडगाव येथील संजय गांधी शाखेमार्फत सर्व केंद्र चालक व राज्य आणि केंद्र पुरस्कृत योजनांतील लाभार्थ्यांना कळविण्यात येते की, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन योजना तसेच राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी शासन निर्देशानुसार आपले डिजिटल हयात प्रमाणपत्र सादर तथा सत्यापण करणे आवश्यक आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्देशानुसार सर्व लाभार्थ्यांनी दि. 31 मे 2026 पूर्वी स्वतः उपस्थित राहून किंवा जवळच्या सीएससी केंद्र, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी कार्यालय येथे जाऊन ऑनलाइन Beneficiary Satyapan App वर डिजिटल हयात प्रमाणपत्र काढून घ्यावे.
सदर प्रमाणपत्र तहसील कार्यालय, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी, महसूल सेवक किंवा कोतवाल कार्यालयात जमा करणे बंधनकारक राहील. अन्यथा संबंधित लाभार्थ्यांचे पुढील वेतन ऑनलाइन प्रणालीद्वारे आपोआप बंद होऊ शकते, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
तसेच ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी अद्याप दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड व बँक पासबुकची कागदपत्रे तहसील कार्यालय भडगाव येथे जमा केलेली नाहीत त्यांनी ती तातडीने जमा करावीत. प्रमाणपत्रावरील नाव किंवा जन्मतारीखीत तफावत असल्यास संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयाशी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, कोतवाल किंवा संजय गांधी शाखा, तहसील कार्यालय भडगाव येथे संपर्क साधावा. असे आवाहन संजय गांधी
नायब तहसीलदार,रमेश देवकर भडगाव यांनी केले आहे.
सूक्ष्मलोकच्या वृत्ताची दखल; प्रभाग क्र. १० मध्ये लिक्विड फवारणीसाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज भडगाव, प्रतिनिधी…
प्रभाग क्र. १० मध्ये डास प्रतिबंधक फवारणीला आरोग्य विभागाचा हेतुपुरस्सर विलंब? नागरिकांमध्ये संताप भडगाव, प्रतिनिधी…
संकटमोचकांचा आशीर्वाद कुणाला ? उमेदवारीवर राजकीय उत्सुकता जळगाव | विशेष विश्लेषण जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था…
अंजनविहिरे ग्रामपंचायतीकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भडगाव तालुक्यातील अंजनविहिरे येथील ग्रामपंचायत सदस्या ताईसो. रत्नाबाई जयवंत पाटील…
भडगाव तहसीलदार व पुरवठा निरीक्षकांची दस्त बनावट प्रकरणातून निर्दोष मुक्तता १६ वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याचा…