अंजनविहिरे ग्रामपंचायतीकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
भडगाव तालुक्यातील अंजनविहिरे येथील ग्रामपंचायत सदस्या ताईसो. रत्नाबाई जयवंत पाटील तसेच विकास सोसायटीचे चेअरमन दादासो. जयवंत विक्रम पाटील यांचे नातू विवेक जितेंद्र पाटील व प्रणव जितेंद्र पाटील यांनी अनुक्रमे इंजिनिअरिंग व CBSE दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल अंजनविहिरे ग्रामपंचायतीच्या वतीने दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे