ब्रेकिंग न्यूज | साप्ताहिक सूक्ष्मलोक
भडगाव महसूल प्रशासनाची अवैध वाळू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई; तीन ट्रॅक्टर जप्त
भडगाव, दि. १० जून २०२६ (प्रतिनिधी) – उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी आणि तहसीलदार भडगाव यांच्या आदेशानुसार महसूल विभागाने अवैध वाळू वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या कारवाईत मौजे कोठली येथून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर तसेच मौजे टोणगाव येथून अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय भडगाव येथे जमा करण्यात आला आहे.
महसूल प्रशासनाने केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून, महसूल विभागाच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोठली परिसरातील कारवाई
दि. १० जून २०२६ रोजी मौजे कोठली परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल पथकाने तत्काळ कारवाई करत दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेली वाहने पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी तहसील कार्यालय भडगाव येथे जमा करण्यात आली.
या कारवाईतील पथक सदस्य :
- श्री. दिनेश येंडे – मंडळ अधिकारी (पथक प्रमुख)
- श्री. समाधान हूल्लुळे – ग्राम महसूल अधिकारी, कोठली
- श्री. गीतेश महाजन – ग्राम महसूल अधिकारी, कजगाव
- श्री. विवेक महाजन – ग्राम महसूल अधिकारी
- श्री. योगेश पाटील – ग्राम महसूल अधिकारी
- श्री. प्रशांत कुंभारे – ग्राम महसूल अधिकारी, टोणगाव
- श्री. लोकेश महाजन – ग्राम महसूल अधिकारी, आंचळगाव
- श्री. करण कुलकर्णी – ग्राम महसूल अधिकारी, तांदूळवाडी
- श्री. महादू कोळी – महसूल सहाय्यक
- श्री. किरण मोरे – महसूल सेवक, टोणगाव
टोणगाव परिसरातील कारवाई
याच दिवशी महसूल विभागाने मौजे टोणगाव परिसरातही कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पकडला. संबंधित वाहन तहसील कार्यालय भडगाव येथे जमा करण्यात आले असून पुढील दंडात्मक कार्यवाही सुरू आहे.
या कारवाईतील पथक सदस्य :
- श्री. दिनेश येंडे – मंडळ अधिकारी (पथक प्रमुख)
- श्री. एस. के. मांडोळे – ग्राम महसूल अधिकारी, अंजनविहिरे
- श्री. व्ही. पी. शिंदे – ग्राम महसूल अधिकारी, कोळगाव
- श्री. लोकेश महाजन – ग्राम महसूल अधिकारी, आंचळगाव
- श्री. करण कुलकर्णी – ग्राम महसूल अधिकारी, तांदूळवाडी
- श्री. प्रसाद दुदुस्कर – ग्राम महसूल अधिकारी, वाक
- श्री. गौरव पगारे – ग्राम महसूल अधिकारी, पिंप्रीहाट
- श्री. किरण मोरे – महसूल सेवक, टोणगाव
प्रशासनाचा इशारा
महसूल विभागाने स्पष्ट केले आहे की, शासनाच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात अशाच प्रकारच्या धडक कारवाया पुढेही सुरू राहणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
सर्वसामान्य सुज्ञ नागरिकांचे मत
भडगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असून पर्यावरणालाही धोका निर्माण होतो. महसूल विभागाने केलेली ही कारवाई स्वागतार्ह असून अशा कारवाया सातत्याने सुरू राहाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
साप्ताहिक सूक्ष्मलोक
“साकार समाज राष्ट्राची दक्षता”



