शैक्षणिक

वनार्टीच्या जागावाटपावर धनगर समाजाचा आक्षेप; ‘NT-C’ प्रवर्गाला डावलल्याचा आरोप

वनार्टीच्या जागावाटपावर धनगर समाजाचा आक्षेप; ‘NT-C’ प्रवर्गाला डावलल्याचा आरोप

८ जूनची सर्व परिपत्रके रद्द करून शासनाच्या मूळ आरक्षणानुसार नव्याने जागावाटप करण्याची ~ बिरू कोळेकर यांची मागणी

मुंबई | प्रतिनिधी

वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) मार्फत ८ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध विद्यार्थी कल्याण योजनांच्या जागावाटपावरून नवा वाद निर्माण झाला असून, धनगर समाजासह NT-C प्रवर्गावर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या आरक्षणाच्या मूळ प्रमाणाला छेद देत जागांचे वाटप करण्यात आल्याचा दावा करत संबंधित सर्व परिपत्रके तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्यचे राज्य संघटक, मुख्य प्रवक्ता तथा आयटी व मीडिया प्रमुख श्री. बिरू कोळेकर यांनी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री मा. अतुल सावे यांच्याकडे निवेदन सादर करून ही मागणी केली आहे.

निवेदनानुसार, महाराष्ट्र शासनाच्या विद्यमान आरक्षण रचनेत VJNT प्रवर्गाचे उपवर्गनिहाय प्रमाण VJ-A – ३ टक्के, NT-B – २.५० टक्के, NT-C – ३.५० टक्के आणि NT-D – २ टक्के असे आहे. या प्रमाणाचे शंभर टक्क्यांमध्ये रूपांतर केल्यास VJ-A ला २७ टक्के, NT-B ला २३ टक्के, NT-C ला ३२ टक्के आणि NT-D ला १८ टक्के प्रतिनिधित्व मिळणे अपेक्षित आहे.

मात्र वनार्टीच्या परिपत्रकांमध्ये VJ-A साठी ४० टक्के, NT-B साठी २२.५० टक्के, NT-C साठी २२.५० टक्के आणि NT-D साठी १५ टक्के जागा राखून ठेवण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे शासनाच्या मूळ आरक्षण रचनेनुसार सर्वाधिक हिस्सा असलेल्या NT-C (धनगर) प्रवर्गाला तुलनेने कमी वाटा मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या वाटपामुळे धनगर समाजातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार आणि युवकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, त्यांच्या शैक्षणिक व करिअरच्या संधींवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

श्री. कोळेकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून वनार्टीने कोणत्या शासन निर्णय, कायदेशीर तरतूद अथवा धोरणाच्या आधारे सदर वाटप केले याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. तसेच ८ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली सर्व संबंधित परिपत्रके रद्द करून शासनाच्या मूळ आरक्षणाच्या प्रमाणानुसार न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने नव्याने जागावाटप करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास धनगर समाजासह VJNT प्रवर्गातील विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने राज्यव्यापी लोकशाही आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे वनार्टीच्या जागावाटप प्रक्रियेतील पारदर्शकता आणि आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, शासन यावर कोणती भूमिका घेते याकडे राज्यभरातील VJNT समाजाचे लक्ष लागले आहे.

Uncover a realm of opportunities.

Exploring life’s complex tapestry, options reveal routes to the exceptional, requiring innovation, inquisitiveness, and bravery for a deeply satisfying voyage.

Embark

ON A HIKING

adventure and explore the beauty of nature’s best…

In the

WOODS.

सूक्ष्मलोक NEWS

sukshmalok.in साकार समाज...राष्ट्राची दक्षता... सूक्ष्मलोक NEWS मालक, प्रकाशक व संपादक : विठ्ठल कौतिक पाटील, ASSK तहसिल कार्यालय भडगाव, ता. भडगाव, जि. जळगाव, महाराष्ट्र – 424105. मोबा. : 9423159516 ई-मेल : sukshmalok@gmail.com “सूक्ष्मलोक” NEWS मध्ये प्रकाशित होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन “सूक्ष्मलोक” NEWS करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम “सूक्ष्मलोक” NEWS द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव “सूक्ष्मलोक” NEWS ’!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *